मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या वारसांना नोकरी मिळणार

संग्रहित छायाचित्र

परिवहन विभागाचा निर्णय : संबंधित कुटुंबांना मागविली माहिती

पुणे – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात मृत्यू पडलेल्या युवकांच्या कुटुंबांची माहिती राज्याच्या परिवहन विभागाने मागवून घेतली आहे. त्यांची माहिती आणि अर्जांची छाननी करून त्याबाबतची पुढील प्रक्रिया परिवहन विभागाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. ही सर्व पूर्तता झाल्यानंतर त्यांना येत्या 26 जानेवारीपासून या वारसांना प्रत्यक्षात नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यांची ही नोकरी कायमस्वरूपी असणार असून त्यांना तातडीने नियुक्‍तीपत्रे देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

मराठा समाजाने आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी राज्याच्या विविध भागात आंदोलने करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात ही आंदोलने शांततेत सुरू होती. मात्र, राज्य शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने राज्याच्या विविध भागातील 48 तरुणांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला होता. हे सर्व युवक कमावते असल्याने या युवकांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याची राज्य शासनाच्या परिवहन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. जे युवक या आंदोलनात मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्या एका वारसाला एसटी महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. त्याची दोन दिवसांपूर्वीच त्याबाबतची घोषणा केली आहे.

रावते यांच्या घोषणेनुसार एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने त्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्य कार्यालयाच्या वतीने या मृतांच्या कुटुंबांना पत्र पाठवून त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय कुटुबांत किती व्यक्‍ती आहेत. या नोकरीसाठी कोण पात्र आहे, त्यांची शिक्षण पात्रता किती आहेत, घरातील कोणत्या वारसांकडे वाहकांचा बॅच म्हणजेच परवाना आहे का, नोकरदार कोणत्या आगारात अथवा वर्कशॉप तसेच कार्यालयात काम करू शकतो, वारसांकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का, ही सर्व माहिती मागविण्यात आली आहे.

यासंदर्भातील एक लेखी फॉर्मही देण्यात आला आहे. हा फॉर्म भरून देण्यासाठी महामंडळाच्या वतीने 15 दिवसांचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. परंतु, या कुटुंबांची सध्याची दु:खाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यासाठी कालावधी वाढवून देण्याचा महामंडळ गांभीर्याने विचार करत आहे. मात्र, हे वास्तव असले तरी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी वारसांनी त्याबाबतची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी या वारसांनी सहकार्य करावे, असे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी केले आहे.

… अशी मिळणार नोकरी
महामंडळाने नोकरी उपलब्ध करून दिली असली तरीही त्यातील बहुतांशी वारसांकडे वाहकाचा बॅच अथवा वाहन चालविण्याचा परवाना नाही, त्यामुळे त्यांची नोकरी धोक्‍यात येण्याची अफवा पसराविण्यात आली होती. हे वास्तव असले तरी त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार त्या-त्या विभागात नोकरी देण्यात येणार आहे. ज्या वारसांचे शिक्षण कमी आहे त्यांना शिपाई अथवा अन्य विभागात नोकरी लावण्यात येणार आहे. त्याशिवाय त्यांनी पुढील काळात शिक्षण पूर्ण केल्यास त्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे, असेही देओल यांनी स्पष्ट केले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)