मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

यवत – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलने, मोर्चे, रास्तारोको करण्यात आले. यावेळी विविध ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी दौंड तालुका मराठा महासंघाने केली आहे. या मागणीचे निवेदन यवतचे मंडलाधिकारी दीपक कोकरे यांच्याकडे शनिवारी (दि.4) देण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात सगळीकडे जोरदार आंदोलने होत आहेत. मागील काही दिवसात चाकण, पुणे येथे आंदोलन झाले परंतु मराठा क्रांती मोर्चामध्ये काही बाहेरील लोक घुसुन तोडफोड केल्याचे समोर आले आहे. यावेळी हजारो जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या आंदोलनातील निरपराध तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी तहसीलदार दौंड आणि मंडलाधिकारी यवत यांना मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हा सचिव मयुर सोळसकर, युवकचे तालुका उपाध्यक्ष विशाल राजवडे, विद्यार्थी मराठा तालुकाध्यक्ष सूरज चोरघे, रामदास जाधव, युवकचे तालुका कार्याध्यक्ष अतुल आखाडे, निखिल देशमुख, कुणाल पासलकर, विकास टेमगिरे, विशाल कुंजीर, सोमा शेळके, प्रेम निंबाळकर, सिध्दांत कोलते, शुभम शेळके यांच्यासह आदी मराठा महासंघाचे युवक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)