मराठवाड्यातील 40 विद्यार्थिनींना “एसकेएफ’चे “उड्‌डाण’

पिंपरी – एसकेएफ कंपनीच्या वतीने “उड्‌डाण’ योजनेअंतर्गत मराठवाड्यातील 40 गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. या योजनेचे हे दुसरे वर्ष आहे.

एसकेएफ इंडियाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष राकेश माखिजा व व्यवस्थापकीय संचालक मनीष भटनागर यांनी या शिष्यवृत्तीची घोषणा केली. “उड्‌डाण’ योजनेतील पात्र विद्यार्थिनींना दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या निवडीनुसार व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च शिष्यवृत्तीतून दिला जातो. यावर्षी ही योजना महाराष्ट्रातल्या मराठवाडा या दुष्काळी आणि औद्योगिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या भागात सुरु करण्यात आली.

2017 या वर्षी दहावीच्या परीक्षेत 85 टक्‍क्‍यांहून अधिक गुण आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी, या अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र ठरल्या. शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर कौशल्य या निकषांवर आधारित पूर्णपणे निष्पक्ष प्रक्रियेतून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थिनींची निवड झाली. एसकेएफ शिष्यवृत्ती योजनेत विद्यार्थिनींना आर्थिक साह्याव्यतिरिक्त व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसाय मार्गदर्शन अशा मार्गाने सक्षम करण्याचा अंतर्भाव आहे.

राकेश माखिजा म्हणाले, मुलींना शिक्षण देणे आणि प्रगती करण्याची तसेच जीवनात उंची गाठण्याची संधी देणे आपल्या समाजासाठी फार महत्त्वाचे आहे. भारतात तर हे अधिकच महत्त्वाचे ठरते. कारण आपल्याकडे मुलींना उच्च शिक्षण देण्याला प्राधान्य दिले जात नाही. या सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमातून एसकेएफ इंडिया बुद्धिमान आणि होतकरू विद्यार्थिनींना आर्थिक अडचणींवर मत करून आपले स्वप्न निर्भयपणे साकार करण्यासाठी हातभार लावणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)