मराठवाडी धरणग्रस्तांबाबतचा निर्णय ऐतिहासिक

ना. शिवतारे ः उमरकांचनला धरणग्रस्त कृती समितीतर्फे नवजीवनोत्सव

ढेबेवाडी, दि. 11 (प्रतिनिधी) -वांग मराठवाडी धरणग्रस्तांसंदर्भात झालेला निर्णय हा ऐतिहासिक असून मिळालेल्या निधीचा उपयोग जमीन खरेदीसाठीच करावा, जमीन खरेदीसाठी आपले मुद्रांक शुल्क माफ करण्यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी मी आग्रही राहीन. महाराष्ट्रात आता नवीन धरणे बांधणे शक्य नाही. यापुढे धरणांची उभारणी करण्यापेक्षा जलयुक्त शिवार हा योग्य पर्याय राहील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी केले.
उमरकांचन, ता. पाटण येथे धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने नव जीवनोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय मेधा पाटकर या होत्या. यावेळी आ. नरेंद्र पाटील, भाजपचे प्रवक्ते भरत पाटील, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, सुनीती सू. र. यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. शिवतारे म्हणाले, धरणांची उभारणी करताना विस्थापितांना केंद्रबिंदू मानून नियोजन झाले पाहिजे. अस्मितेपेक्षा अस्तित्वाला महत्व दिले गेले तर राज्याचा विकास पुढे जाईल. चळवळीमधील लोक राजकीय प्रक्रियेत आले तर न्याय मिळेल.
मेधाताई पाटकर म्हणाल्या, धरण प्रकल्प उभारल्यानंतर त्या ठिकाणी निर्माण होणार्‍या रोजगाराची संधी धरणग्रस्तांनाच मिळाली पाहिजे, एकीकडे जल नियोजन व दुसरीकडे विस्थापन असे समीकरण झाल्यास कुठेही विरोध होणार नाही. कायदे होऊन सुध्दा धरणग्रस्तांना न्याय मिळत नाही. वीस वर्षाचा आढावा घेतला तर धरणाचे काम रखडत गेले. त्यामुळे धरणाचे बजेट वाढत गेले. धरणग्रस्तांनी मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करावा. या पैशातून जमीनी घ्या, मुलांचे शिक्षण करा परंतु पैसे व्यर्थ खर्च करु नका.
सुनीती सु. र. म्हणाल्या, आंदोलनाच्या वेळी सहन केलेले प्रसंग, धरणाच्या पाण्यात केलेली आंदोलने, आमरण उपोषणे असा या आपल्या प्रयत्नांना यश आले आहे.
ज्या धरणग्रस्तांनी या लढ्यात, आंदोलनात भाग घेतला. अशा जीवाची पर्वा न करता 20 वर्षे सतत आंदोलन करणार्‍या महिला, वृद्धांचा प्रमुख मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा पाटबंधारेचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे, अतिरिक्त जिल्हा अधिकारी गायकवाड, उपायुक्त पुनर्वसन दिपक नलवडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, सांगली जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्वाती कुलकर्णी, कार्यकारी अभियंता हिरे, कराड व पाटण चे उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होती.
सुनील मोहिते यांनी प्रास्ताविक केले. प्रताप मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच विद्या मोहिते यांनी आभार मानले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)