मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनासाठी रहाटणीत बैठक

पिंपरी – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दहा मराठवाडा संघटनांतर्फे संयुक्तपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भात बैठक नुकतीच रहाटणीतील बळीराज मंगल कार्यालय येथे पार पडली. बैठकीला कला-क्रीडा, साहित्यिक, उद्योजक, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले मराठवाडयातील 470 बांधव उपस्थित होते.

शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून नियोजन समितीची बैठक सुरु करण्यात आली. यामध्ये मराठवाड्यातील बांधवांचे आर्थिक, सामाजिक प्रश्‍न कोणत्या मार्गाने सोडवता येतील, तसेच कार्यक्रम कोणत्या स्वरूपात करावा याविषयी चर्चा करण्यात आली. मराठवाड्यातील 10 संघटना मिळून 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम एकसंघ समितीद्वारे साजरा करणार आहेत. तसेच, अनेक बांधवांच्या सूचनाही यावेळी घेण्यात आल्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानंतर मराठवाडा भवन तयार होईपर्यंत प्रत्येक बांधव आठवड्यातून किमान एक तास आपल्या भवनासाठी देणार असल्याची शपथही यावेळी घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)