मराठवाडा मित्र मंडळाच्या चार महाविद्यालयांना “ए’ श्रेणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 28 – मराठवाडा मित्र मंडळ संस्थेच्या चार महाविद्यालयांना “नॅक’कडून “ए’ श्रेणी जाहीर झाली आहे. मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयास (एमएमसीसी) तिसऱ्या फेरीतही “ए’ मिळाली आहे. अन्य तीन महाविद्यालयांना पहिल्या फेरीसाठी “ए’ श्रेणी प्राप्त झाली आहे.

डेक्‍कन जिमखाना येथील शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, लोहगाव येथील मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, कर्वेनगर येथील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एमएमसीसी अशा चार महाविद्यालयांना ही श्रेणी मिळाली आहे. प्राचार्य डॉ. एम. डी. लॉरेन्स, डॉ. क्रांती देशमुख, डॉ. रूपेश भोरटक्‍के, डॉ. सुनील देशपांडे अशा चार प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने हे यश मिळविले आहे. शैक्षणिक दर्जाच्या जोरावर ही श्रेणी मिळाली आहे. शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जात नसल्यानेच महाविद्यालयांना “ए’ श्रेणी प्राप्त करता आली, असे चारही प्राचार्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“स्पर्धेच्या युगात आणि बदललेल्या काळानुसार गुणवत्तेवर भर दिल्याने नॅकची “ए’ श्रेणी मिळाली आहे. ही श्रेणी मिळाली असली ते अंतिम नाही. आता आणखी सुधारणा करण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. संस्थेने वरचा टप्पा गाठला असला तरी ते टिकविणे आणि पुढे नेण्यासाठी जबाबदारी वाढली आहे.’ 

प्राचार्य भाऊसाहेब जाधव : कार्याध्यक्ष , मराठवाडा मित्र मंडळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)