मराठवाडा, मध्य महाराष्ट्र ढगाळ वातावरण; काही ठिकाणी किरकोळ सरी

पुणे – मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यामध्ये रुपांतर झाल्याने गेले दोन दिवस काही भागांत हलक्‍या सरी कोसळल्या; तर काही भागांत ढगाळ वातावण होते

उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा, समरकुंडी, येडशी, पारा, कळंब आणि नगर जिल्ह्यातील पारनेर, बेलापूर येथे गुरुवारपासून ढग दाटून आले होते. काही भागांत तुरळक सरी कोसळल्या. सध्या खरीप पिकांची काढणी सुरू आहे. त्यातच ढग दाटून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पाऊस झाल्यास हाती येणारे पिक देखील जाण्याची शक्‍यता होती. साताऱ्यात दुपारनंतर सोसाट्याचा वारा आणि ढग दाटून आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भाग, कर्नाटक या परिसरात समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर कमी चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली होती. तसेच विदर्भ आणि तेलंगणा परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी ढग दाटून आले; तर काही ठिकाणी हलक्‍या सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रातील मिरज, पाटण, तासगाव येथे वीस मिलिमीटर, फलटण, सांगली, विटा येथे दहा मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे 30 मिलिमीटर, बीड जिल्ह्यातील शिरूर, अनंतपाल येथे दहा मिलिमीटर पाऊस पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)