मराठवाडा जन विकास संघाचा वर्धापन दिन उत्साहात

सांगवी – पिंपळे-गुरव येथील मराठवाडा जन विकास संघाचा सहावा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पिंपरी-चिंचवडमधील झाडांना वॉटर टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला. तसेच कासारवाडी येथील श्री साईदत्त मंदिर गो-शाळेला ट्रकभर चारा देण्यात आला. पिंपळे-गुरवमधील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरीक संघास झाडांना पाणी घालण्यासाठी झारे देण्यात आले. याबरोबरच पिंपरी-चिंचवड प्लास्टिक कचरामुक्‍त व्हावे, यासाठी स्वच्छता विषयक प्रबोधन करून कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

आमदार लक्ष्मण जगताप, ह.भ.प. शिवानंद महाराज, शिव कीर्तनकार डॉ. गजानन वाव्हळ, समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक उमरगेकर, विजुअण्णा जगताप, मराठवाडा जन विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, नगरसेविका उषा (माई) ढोरे, सीमा चौगुले, नगरसेवक सागर अंगोळकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, राजेंद्र राजापुरे, भैरुजी मंडले, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, माधव मनोरे, नामदेव पवार, शशिकांत दुधारे, शिवाजी पाडुळे, विजय सोनवणे, सुभाष धराडे, सखाराम वालकोळी, नितीन चिलवंत, गौरीशंकर किणीकर, शिवाजी सुतार, अण्णा जोगदंड, सिद्धेश्वर आगलावे, नाना साळुंखे, किरण मुंडे, रोहित गोरे, विजय वडमारे यावेळी उपस्थित होते. शारदा मुंडे यांनी अरुण पवार यांना अविरत सेवा कार्याबद्दल सम्राट अशोकस्तंभ सन्मानचिन्ह भेट देवून सन्मानीत केले.

प्रा. डॉ. गजानन वाव्हळ महाराज म्हणाले, माणसाला माणूस म्हणून जगण्याची गरज आहे. पाश्‍चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये खूप फरक आहे. आपण भारतीय संस्कृती जोपासावी. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना आवडतात; पण त्यांची कृती अवघड आहे, म्हणून ती होत नाही. तरुणांनी ती कृती आवडीने करण्याची गरज आहे.

शिवानंद महाराज म्हणाले, मराठवाडा जन विकास संघाची ही गरुड-झेप आहे. संघाने गेल्या सहा वर्षात संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे. एकीची शिकवण मराठवाडा जन विकास संघाच्या कार्यातून मिळते. सूर्यकांत कुरुलकर यांनी सूत्रसंचालन व वामन भरगंडे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)