मरकळ संस्थेच्या अध्यक्षपदी नवनाथ लोखंडे

उपाध्यक्षपदी शिवाजी लोखंडे : दोन्ही निवडी बिनविरोध

चिंबळी- मरकळ (ता. खेड) येथील विविध कार्यकारि सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी नवनाथ लोखंडे तर उपाध्यक्षपदी शिवाजी लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जे. बी. मुलाणी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत माजी सरपंच तथा संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाराम लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तर खेड तालुक्‍याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मरकळ येथील विविध कार्यकारि सहकारी सेवा संस्थेचे काम सुरू आहे. तर या संस्थेच्या सर्व संचालक मंडाळास काम करण्याची संधी मिळावी म्हणून संस्थेच्या अध्यक्ष संतोष भुसे व उपाध्यक्ष अनिता वर्पे यांनी स्वखुशीने पदाचा राजीनामा दिल्याने या दोन्ही रिक्‍त जागेसाठी खेड येथे निवडणूक निर्णय अधिकारी जे. बी. मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्षपदासाठी नवनाथ लोखंडे तर उपाध्यक्षपदासाठी शिवाजी लोखंडे यांचेच एकममेव अर्ज आल्याने या दोघांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सर्व संचालक मंडाळाच्या उपस्थित खेड तालुका खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे व नाना टाकळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक व सचिव उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)