मरकळ येथे भैरवनाथ यात्रेत रंगला कुस्तांचा आखाडा

चिंबळी- मरकळ (ता. खेड) येथील भैरवनाथ महाराजांचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती माजी सरपंच व खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे यांनी दिली.
भैरवनाथ महाराजांचा उत्सवानिमित्त बुधवार (दि. 9) मंदिराला विद्युत रोषणाईसह भव्य मंडप उभारण्यात आला होता. सकाळी आठ ते दहा श्रीची महापूजा, हार-तुरे, मांडवडहाळे,तसेच अभिषेक करण्यात आला. रात्री करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. गुरुवारी (दि. 10) दुपारी तीन ते सहापर्यंत कुस्तांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आला होता. आखाड्याचा शुमारंभ माजी सरपंच व खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे व सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. या आखाड्यात खेड, हवेली, शिरूर तालुक्‍यातील चाकण, भोसरी, खेड, मोई, निघोजे, केळगांव, मोशी, डुडूळगांव, चल्होरी, धानोरे, गोलेगाव, तुळापूर, लोणीकंद, लोहगांव, वाघोली, राहू, पिपंळगांव, आळंदी परिसरातील सुमारे दोनशे मुला-मुली मल्लांनी सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवली. या कुस्ती स्पर्धेसाठी शंभर रुपायांपासून पंधरा हजार रुपयांपर्यतची रोख रक्‍कम आणि चादींची गदा बक्षीस ठेवण्यात आली होती. यामध्ये सुमित गुजर व निखिल कदम यांची निकाली कुस्ती लावण्यात आली. यामध्ये निखल कदम याने दहा मिनिटात कुस्ती निकाली केल्याबद्दल त्याला पंधरा हजार रुपये व एक चादींचा गदा विविध मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली. याप्रसंगी भैरवनाथ यात्रा कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. रात्री दहा वाजता करमणुकीसाठी ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमांनी या उत्साहाची सांगता करण्यात आली या कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून राजाराम वर्पे, गणेश लोखंडे, सागर लोखंडे यांनी काम पाहिले, तर सुत्रसंचालन भगवान लोखंडे, पांडाशेठ लोखंडे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)