मरकळ येथे बारावी केंद्र झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर

परीक्षेला वेळेत पोहोचणे झाले सुलभ : विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

चिंबळी- मरकळ (ता. खेड) येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात यंदापासून बारावी परीक्षा केंद्र सुरू करण्यात आल्याने पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली असल्याने विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या केंद्रावर केशवराज शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले.
यापूर्वी विद्यार्थ्यांना तब्बल वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोली, लोणीकंद, चाकण, आळंदी आदी ठिकाणी परीक्षेसाठी जावे लागत होते. अंतर अधिक असल्याने वेळेचा देखील अपव्यय होत होता. मात्र आता मरकळ (ता. खेड) येथेच परीक्षा केंद्र झाल्याने विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षेसाठी पोहोचणे सुलभ झाले असून वाचलेला वेळ अभ्यासाला देता येत आहे.
या केंद्रात मरकळ कॉलेज, नेताजी सुभाषचंद्र मिलिट्री स्कूल, लोकसेवा ज्युनियर कॉलेज – फुलगाव, छ. संभाजीराजे ज्युनियर कॉलेज, ग्लोरी ज्युनियर कॉलेज – कोरेगाव भीमा या कॉलेजमधील एकूण 441 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, व विज्ञान शाखेचे विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी दक्षता समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य यू. व्ही. जाधव आणि केंद्र संचालक एस. व्ही. आव्हाळे यांनी दिली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव लोखंडे, सचिव सुभाष घेनंद, संभाजी भुसे, खजिनदार लक्ष्मण लोखंडे, तुकाराम वहिले,नवनाथ लोखंडे, विनोद वहिले, जयसिंग लोखंडे, एस. के. सुतार, कॅ. शेख बहाद्दुर थापा, अरूण डोमसे, डी. डी. डोके, प्रा. अनिल मिश्रा, काळुराम गोसावी, पर्यवेक्षक डी. एन. लोंढे, उपकेंद्र संचालक डी. आर. नाईकडे, एस. व्ही. जाचक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)