मरकळ परिसरात रस्त्यांवर खड्डे

चिंबळी -गेले दहा ते पंधरा दिवस सतत पाऊस पडल्याने खेड तालुक्‍यात दक्षिण भागातील चिंबळी, निघोजे, मोई, केळगाव, सोळू, मरकळ परिसरात संततधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले असून गेल्या पंधरा दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदीला पाणी वाढले आहे.
या पावसामुळे खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील कुरूळी-मरकळ जिल्हा परिषद गटातील व पंचायत गणातील मोई, निघोजे, कुरूळी, माजगाव, चिंबळी फाटा ते केळगांव, आळंदी, सोळू, धानोरे, मरकळ ते पाटीलवस्ती पिंपळगाव, गोलेगाव येथील रस्त्यावर मोठ्या संख्येने खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना व शेतकरी वर्गाला पायी चालणे व मोटरसायकल चालविणे मोठे कसरतीचे झाले आहे. या परिसरातील सर्व रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, सरपंच सुनिता येळवंडे, माजी एकनाथ कर्पे, माजी उपसरपंच अमोल विरकर, माऊली चौधरी, आशिष मुऱ्हे या मान्यवरांसह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)