मरकळ केंद्र शाळेची कार्यकारणी जाहीर

चिंबळी- मरकळ (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका सुनिता आहेर यांनी सांगितले. मरकळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीने पालक सभा अध्यक्ष नवनाथ रत्नपारखी यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सर्वानुमते ही निवड करण्यात आली. पालक सभेनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह कार्यकारणीचा माजी सरपंच अनिल लोखंडे, माजी उपसरपंच रोहीदास लोखंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद, पालक, सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यकारणी पुढीलप्रमाणे; अध्यक्ष : किसन लोखंडे. उपाध्यक्ष : लाला लोखंडे. सचिव : मुख्याध्यापिका सुनिता आहेर. सदस्य : दत्तात्रय वर्पे, अंबादास बेंद्रे, विजय लोखंडे, दादासाहेब भुसे, महेंद्र दळवी, मिनाज इनामदार, सपना साळवे, लता चव्हाण. विद्यार्थी प्रतिनिधी : श्रेयश लोखंडे. शिक्षक प्रतिनिधी : विनोद चव्हाण.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)