मरकळमध्ये सरपंच, उपसरपंच पदासाठी चुरस

चिंबळी-मरकळ (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच, उपरपंच पदासाठी कोणाची वर्णी लागते या चर्चेला उधाण आले असून सत्ताधारी गटाचे सदस्य अज्ञातस्थळी सहलीसाठी नेण्यात आले आहेत.
सरपंच मंगल सुभाष खांदवे, उपसरपंच सचिन आनंदा लोखंडे यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी इच्छुक सदस्यांची चढाओढ सुरू झाली आहे. मरकळ ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाकडे नऊ सदस्यांचे संख्याबळ असून विरुद्ध पक्षाकडे सहा सदस्यांचे संख्याबळ आहे. सत्ताधारी गटाचाच पुन्हा सरपंच होण्याची अधिक शक्‍यता असल्याने विरुद्ध गटाकडून सदस्य ओढण्याची शक्‍यता लक्षात घेता सत्ताधारी गटाने आपले सदस्य अज्ञातस्थळी सहलीला पाठविल्याचे समजते. यामुळे गावातील राजकीय चर्चेला उधाण आले असून अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसतानाच राजकीय डावपेच मात्र जोमात आहे. सत्ताधारी गटाकडून ठरल्याप्रमाणे तृप्ती लोखंडे यांना सरपंच पदाची संधी तर लालाशेठ लोखंडे यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात येणार असल्याचे समजते. खेड तालुक्‍याच्या राजकारणातील दखल घेतली जाते असे मरकळ गाव असून ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त आहे. तालुक्‍यातील मोठे गाव असून या ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच पदी कोणाची निवड होते याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)