मरकळमध्ये प्रभातफेरीद्वारे जनजागृती

प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा : विद्यार्थ्यांच्या कवायतींनी पालक आवाक

चिंबळी- मरकळ (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. तत्पुर्वी शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून निर्मल ग्राम राखावे, वृक्षारोपण करणे व जोपासना करण्याचे कार्य करावे, मुलींचा जन्म उत्साहात साजरा करावा आदी विषयी जनजागृती केली. तद्नंतर शाळेतील ध्वजस्तंभाचे पुजनानंतर उपसरपंच लाला लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी माजी सरपंच अनिल लोखंडे-पाटील, दशरथ लोखंडे, विनोद चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच तृप्ती लोखंडे व सर्व महिला सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर प्राथमिक शाळेतील मुला – मुलींनी जवळपास 14 साहित्यांचा वापर करून गणरायांच्या वंदनपर “चिकमोत्याची माळ’ या गीत ढोल ताशाच्या तालावर सादर केले. तर मराठी शाळेतील मुला-मुलींनी लेझीम पथक, ढोल ताशाच्या तालावर शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक प्रसंग, संत ज्ञानोबा, चांगदेव महाराज भेटीचा प्रसंग, विठ्ठल रुक्‍मिणीचे दर्शन देऊन महान क्रिकेट गुरू आचरेकर सर यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर लेझीमच्या खेळातून घरोघरी शौचालय बांधा, अंगणात एक तरी झाड लावा, मुलगा- मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान, मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व आदीचे महत्त्व पटवून दिले.अंगणवाडीतील लहानग्यांनी सुद्धा नृत्य सादर केले व नवीन माध्यमिक विद्यालयातील मुलांनी संचलन करून ध्वजास सलामी देऊन मुलींनी गीतावर नृत्य सादर केले.

  • मरकळ शाळा झाली वायफाय
    मरकळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पालटलेले रूप व विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी उपस्थितांसह पालक व शिक्षक आवक झाले. शाळेची हीच गुणवत्त हेरून ग्रामपंचायतीने शाळेसाठी तत्काळ जवळपास 45 ते 50 हजार रुपये किंमतीची साऊंड सिस्टिम तसेच अंदाजे 20 हजार रूपयांचे क्रीडा व वाद्य साहित्य, शाळेसाठी वाय फाय सिस्टिम बसवून दिली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)