पुणे: मयत, दुबार अशा 54 हजार जणांची नावे वगळली

मतदार याद्या शुद्धीकरण, प्रमाणीकरण : कॅन्टोन्मेटमध्ये सर्वाधिक प्रकरणे

पुणे – राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने शहर आणि जिल्ह्यातील मयत, दुबार अणि स्थलांतरीत अशी 54 हजार 584 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली आहे. कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नावे वगळण्यात आली असून या मतदारसंघात 10 हजार 33 इतक्‍या मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.

2019 हे वर्ष निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे. पुढील वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर मतदार यादी अद्ययावत करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण मोहीम राबविली. त्यानुसार मतदार याद्या अचूक करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. प्रारूप मतदार यादीनुसार 20 हजार 264 नव मतदारांची नोंदणी झाली असून त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 71 लाख 89 हजार 265 इतकी आहे.

मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीतून नावे वगळल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. तसेच याविषयी काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सर्व गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नावे वगळण्याच्या बाबत योग्य ती दक्षता घेतली आहे. मतदार यादी अचूक असावी, मतदार यादीतून कोणाची नावे वगळली याची माहिती नागरिकांना व्हावी, या हेतूने ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात आले. मतदार यादीतील काही नावांबाबत हरकती अथवा दावे असल्यास त्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नोंदविता येणार आहे.

संकेतस्थळावर यादी उपलब्ध
प्रारूप मतदार यादी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या ठिकाणी नागरिकांना आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची माहिती कळणार आहे. ही यादी तपासून ज्यांची नावे वगळली गेली आहेत. त्यांना पुन्हा नाव नोंदविता येणार आहे. 31 ऑक्‍टोंबरपर्यंत नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याबरोबरच, नाव, पत्ता आदींमध्ये दुरुस्ती अथवा एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात नाव स्थलांतर करता येणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)