ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज येथे यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी ममतांनी भाजपच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या संयुक्त विरोधी आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन कॉंग्रेसला केले. सोनिया आणि ममतांमध्ये सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. त्यांच्यात सध्याच्या राजकीय स्थितीवर आणि आगामी निवडणुकांत भाजपला पराभूत करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ममता म्हणाल्या, भाजपशी प्रत्येक राज्यात एकास एक लढत व्हावी. ज्या राज्यात जो विरोधी पक्ष मजबूत आहे; त्या राज्यात त्याला इतरांनी पाठिंबा द्यावा. त्यासाठीच विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कॉंग्रेसनेही बरोबर यावे अशी माझी इच्छा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)