ममता बॅनर्जींना मोदींनी दाखवला ‘योग्य’मार्ग

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. जेव्हा त्यांचं हेलिकॉप्टर शांती निकेतन येथे  पोहोचलं तेव्हा स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोहोचू शकल्या नव्हत्या. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी मोदींचं स्वागत केलं. मोदींनी पाहिलं तर काही अंतरावर ममता बॅनर्जी येताना दिसत होत्या. उशीर झाला असल्याने त्या घाईत होत्या.

वेगाने चालत येत असलेल्या ममता बॅनर्जींनी समोर रस्ता खराब असल्याचं पाहिलं नव्हतं. मोदींनी त्यांना इशारा करत रस्ता खराब असून पुढून या असा इशारा करत योग्य मार्ग दाखवला. यानंतर ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. मोदी सरकार ज्या मार्गाने जातंय, त्याला कडाडून विरोध करणाऱ्या ममतांना अखेर मोदींनी दाखवलेल्या मार्गावरून चालावं लागल्यानं मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी उपस्थित राहणं हा प्रोटोकॉल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)