ममतांच्या विरोधात गुन्हा दाखल

यादवी युद्धाचा इशारा देऊन लोकांना भडकावल्याचा आरोप
गुवाहाटी – नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स मधून चाळीस लाख नागरीकांना वगळण्यात आल्याच्या प्रकरणी तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी प्रक्षोभक विधान केल्याने आसामातील दिब्रुगड जिल्ह्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा विषय आता पुढील कारवाईसाठी पोलिस मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

सरकारने आसामातील चाळीस लाख लोकांना नागरीकत्वाचा हक्क डावलला असून भाजपचे सरकार मुस्लिमांच्या विरोधात आकसाने कारवाई करीत आहे. दलित आणि मुस्लिमांच्या देशात हत्या केल्या जात आहेत. या सगळ्या प्रकारावरून देशात यादवी युद्ध होईल व रक्ताचे पाट वाहतील असे विधान त्यांनी केले आहे. त्यांचे हे विधान लोकांना भडकवण्याचाच प्रकार आहे असे भाजयुमोने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

-Ads-

भाजप लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यांचे हे प्रयत्न आम्ही हाणून पाडू असाही इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला होता. तथापी केवळ मुस्लिमांच्या व्होट बॅंकेसाठी त्या अशा प्रकारची प्रक्षोभक विधाने करीत आहेत असा भाजपचा आरोप आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)