“मन की बात’ 130 कोटी भारतीयांची : मोदी 

नवी दिल्ली: “मन की बात’ सरकारी बात नसून ती सर्व समाजाची आहे. “मन की बात’ महत्वाकांक्षी भारताची आहे. कारण भारताचा आत्मा राजकारण नाही, तर समाजनीती आणि समाजशक्ती आहे. ही “मन की बात’ 130 कोटी भारतीयांची आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) “मन की बात’ या कार्यक्रमातून थेट जनतेशी खास संवाद साधला आहे. 2014 साली सुरू झालेल्या या कार्यक्रमचा आज 50 वा भाग होता. या भागात त्यांनी संविधान दिवस, गुरुनानक जयंतीशी संबंधित गोष्टींवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 5 ऑक्‍टोबर 2014 रोजी “मन की बात’ कार्यक्रम सुरू झाला होता. 50 भागांपर्यंतचा प्रवास हा आपण सर्वांनी मिळून केला आहे. आकाशवाणीनेदेखील यावर सर्वेक्षण केले आहे. जवळपास 70 टक्के लोक नियमितपणे “मन की बात’ कार्यक्रम ऐकतात. या कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मकपणा आला आहे. अनेकांनी आपले अनुभव सांगितले आहेत. या कार्यक्रमामुळे रेडिओ लोकप्रिय होत असल्यामुळे आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“संविधान दिवस’ दिवसाचा उल्लेख करुन मोदींनी संविधान सभेबद्दल आदर व्यक्त केला.

संविधान सभेत देशातील महान व्यक्तीमत्त्वांचा समावेश होता. तीन वर्षात संविधान सभेने व्यापक, विस्तृत संविधानाची निर्मिती केली. संविधानात अधिकार आणि कर्तव्य यांच्याबाबत अधिक सविस्तरपणे असून अधिक स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. नागरिकांच्या आयुष्यातील या दोन्ही गोष्टींचा योग्य ताळमेळ देशाला प्रगतीपथावर नेणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)