‘मन की बात’; शेतमालाला उत्पादनापेक्षा दीडपट जास्त हमीभाव देण्याचा प्रयत्न-मोदी

नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ४२व्या ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले.  सुरुवातीला त्यांनी देशवासियांना आज असणाऱ्या रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. राम आणि रामायणाने जगाला नेहमीच प्रेरणा दिली आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आजच्या ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदी यांनी शिक्षण आरोग्य, जलसंवर्धन,कृषी, स्वच्छता,औद्योगिक विकास अशा विविध विषयांवर देशवासियांशी संवाद साधला. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी आपल्याला शेतकऱ्यांनी पत्रांच्या माध्यमातून हमीभावाबाबत केलेल्या विचारणेचा उल्लेख करत सरकार शेतमालाला उत्पादनापेक्षा दीडपट अधिक हमीभाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

तसेच उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या एका डॉक्टरच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेतली. रुग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या डॉ. अजित मोहन चौधरी यांच्याबाबत माहिती मिळताच मोदींनी प्रशासनाकडून त्यांची पूर्ण माहिती घेतली; तसेच त्यांच्या कार्याचे कौतुकही केले.  तसेच मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान ग्राम स्वराज्य अभियान आयोजित करण्यात येणार असल्याचे म्हटले. त्याअंतर्गत देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)