‘मन’ की बात मध्ये महत्वाच्या विषयांचा संदर्भच नसतो

कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांची टीका

नवी दिल्ली,  आकाशवाणीवरून पंतप्रधान सादर करीत असलेल्या मन की बात या कार्यक्रमावर कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी टीकास्त्र सोडले आहे. या व्यासपीठाचा वापर लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि महत्वाच्या विषयावर भाष्य करण्यासाठी पंतप्रधानांनी करणे अपेक्षित आहे पण त्यात असे काहीच होताना दिसत नाही. लोकांना सणांच्या निमीत्ताने शुभेच्छा देण्यासाठी आणि कोणाचे तरी कौतुक करण्यासाठीच ही भाषणे केली जातात त्याच वैचारीक दृष्टीकोन दिसून येत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

महिलांची सुरक्षा, सीमेवर जवानांचे जात असलेले बळी, गोरखपुरला झालेले बालकांड, रेल्वे अपघातात लोकांचे गेलेले बळी अशा विषयावर पंतप्रधानांनी भाष्य करणे अपेक्षित होते पण असे विषय ते कटाक्षाने टाळतच असल्याचे दिसून आले आहे असेही दीक्षित यांनी नमूद केले आहे. गेल्या 10-15 वर्षात भारत-पाक सीमेवर जितके सैनिक शहीद झाले नाहीत त्यापेक्षाहीं अधिक सैनिक मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात शहीद झाले आहेत त्यावर मोदींनी पाकिस्तानला परखड बोल सुनावणे अपेक्षित होते पण मोदींनी या कार्यक्रमात तेही कधी केले नाही.. सैनिकांच्या मृत्यूची पंतप्रधानांना काहीच चिंता दिसत नाही असेही त्यांनी नमूद केले. साक्षी महाराजांसारखे स्वपक्षातलेच नेते काही आक्षेपार्ह विधाने करतात पण त्यावरही मोदींनी कधी भाष्य केलेले दिसले नाही असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)