मनोहर शिंदे यांचेवर आरोप म्हणजे “नाचना येईना अंगण वाकडे’

माजी नगरसेवक गजेंद्र बुधावले यांची विरोधकांचा चपराक

कराड – मलकापूर नगरपंचायत/नगरपरिषद निवडणूक पूर्वीचा प्रभाग 4 व सध्याचा प्रभाग नं. 9 मध्ये या भागाचा समावेश आहे. त्यामुळे बोगस मताचा प्रश्‍न येत नाही. विरोधकांनी केलेले आरोप हे वस्तुस्थितीला धरुन नाहीत. माझ्यासारख्या सर्वसामान्य इतर मागासवर्गीय लोकप्रतिनिधीवर असे आरोप करण्याचे त्यांना आत्ताच का सुचले? त्यांनी खरी वस्तुस्थिती जाणून घ्यावयाची असेल तर कृष्णा हॉस्पिटलमधील अंदाजे 300 मतदार व त्यांच्या घराची नोंद कोठे हे शोधून काढावे. तसेच आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) व मनोहर शिंदे यांच्याविषयी वक्तव्य करणारी आधी आपली राजकिय उंची तपासून घ्यावी, असा इशारा माजी नगरसेवक गजेंद्र बुधावले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, मलकापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक सध्या होऊ घातलेली आहे. त्या अनुषंगाने सध्या मलकापूरमध्ये राजकीय चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जानेवारी 2019 मध्ये 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या व ज्यांचे नाव मलकापूरच्या मतदार यादीत नाही. अशा सर्वांची जनजागृती निवडणूक आयोग यांचेमार्फत मतदान नोंदणी करीत आवाहन केले व या कामासाठी ऑनलाईन मतदान नोंदणी करणे व मयत नावे कमी करणे, याकरीता सदर यंत्रणेमार्फत (र्पीीं.ळिप पोर्टलद्वारे) शासनाने सुविधा उपलब्ध करुन दिली होती. परंतु मलकापूर शहरामध्ये नमुना नंबर 7 द्वारे ऑनलाईन पद्धतीने निवडणूक विभागाने अर्जदारांचे संमतीशिवाय बोगस व बनावट स्वरुपाचे अर्ज केलेले आहेत.

त्याअनुषंगाने प्राप्त अर्जानुसार संबंधितांना उदा. सौ. मनिषा प्रशांत चांदे, सौ. अश्‍विनी मोनह शिंगाडे इ. यांना नावे कमी करणेबाबत निवडणूक शाखा, तहसिल कार्यालय कराड यांचेमार्फत लेखी स्वरुपात विचारणा केली गेली. यावरुन हा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नगरपरिषदेच्या संभाव्य उमेदवारांचा समावेश दिसून आला. यावरुन मलकापूर शहरातील सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी संघटीतपणे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, कराड, उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन दिले.

यानंतर काही मंडळींच्या पोटात पोटसुळ उठला असून त्यांनी मनोहर शिंदे यांचेवर राजकीय द्वेषातून मतदान नोंदणीचे चुकीचे आरोप केले आहेत. ते लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा आरोप केवळ मुख्य विषयापासून लोकांचे लक्ष विचलित करण्याच्यादृष्टीने करण्यात आलेला आहे.

बुधावले म्हणतात की, मी स्व. भास्करराव शिंदे यांचे वाहनावर चालक म्हणून काम करत होतो. त्यावेळेस मी त्या ठिकाणी राहत होतो व माझे बरोबर मुजावर तसेच जामदाडे सुद्धा राहत होते. त्याचबरोबर इतर मंडळी सुद्धा भाडेकरु म्हणून राहत होती. त्यावेळेस सदरचा पत्ता असलेने त्या ठिकाणी आमची तसेच इतरांची मते नोंद करण्यात आली आहेत. वस्तुस्थिती सध्या मी गेली पाच वर्षे मलकापूर नगरपंचायत प्रभाग क्र. 4 चा नगरसेवक असून माझे व इतरांचे घर व जागा मलकापूरमध्ये आहे.

याबाबत कोणास काही शंका असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. ज्या यादीचा उल्लेख करुन आरोप केला जात आहे. ती यादी विधान सभेची केंद्रनिहाय यादी आहे. मलकापूरच्या निवडणुकीमध्ये मलकापूरचे भवितव्य सर्वसामान्य जनताच ठरवणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)