मुंबई: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री अचानक त्यांना स्वादूपिंडाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा एकदा लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर फेब्रुवारी महिन्यात प्रथम मुंबईतील इस्पितळात दाखल झाले होते. त्यांना स्वादूपिंडाशीसंबंधित जास्त त्रास झाल्याने त्यांना अमेरिकेत उपचारांसाठी जावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर पर्रीकर यांना दिला होता. त्यानंतर ते 7 मार्च रोजी गोव्याहून अमेरिकेला उपचारासाठी गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)