मनोहर पर्रीकर तीन महिन्यानंतर अमेरिकेहून परतले

प्रातिनिधिक छायाचित्र

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सुमारे तीन महिने अमेरिकेत उपचार घेऊन पुन्हा गुरूवारी परतले आहेत. मनोहर पर्रीकर यांच्यावरील उपचार यशस्वी झाले असून त्यांची प्रकृती सुधारली आहे, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. मनोहर पर्रीकर परतल्याने गोवा भाजपमध्ये व मंत्रिमंडळातही उत्साह आहे.

मुख्यमंत्री फेब्रुवारी महिन्यात प्रथम मुंबईतील इस्पितळात दाखल झाले होते. त्यांना स्वादूपिंडाशीसंबंधित जास्त त्रास झाल्याने त्यांना अमेरिकेत उपचारांसाठी जावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर पर्रीकर यांना दिला होता. त्यानंतर ते 7 मार्च रोजी गोव्याहून अमेरिकेला उपचारासाठी गेले होते. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा कुणाकडेच सोपवला नव्हता. त्यांच्या अनुपस्थितीत गोवा राज्याचा सरकारी कारभार पुढे नेण्यासाठी त्यांनी तीन मंत्र्यांची समिती नेमली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या तीनपैकी एक मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे अलिकडेच पोर्तुगालच्या दौऱ्यावर गेले आहेत. मनोहर पर्रीकर यांच्यावर तीन महिने अमेरिकेत उपचार झाले. अमेरिकेत असताना त्यांनी फोनवरून गेल्या महिन्यातच काही मंत्री, आमदारांशी संपर्क साधून आपण आता ठिक होत असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, मनोहर पर्रीकर हे बुधवारी अमेरिकेहून भारतात विमानाने परतले. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास ते मुंबईत दाखल झाले. त्यानंतर एका तासाने त्यांनी गोव्याकडे येणारे विमान धरले. मनोहर पर्रीकर हे शुक्रवारी 15 रोजी मंत्रिमंडळातील आपल्या सर्व सहकाऱ्यांना भेटणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)