मनोहर पर्रिकर यांच्या नावाने फिरणारा ‘तो’ मेसेज बनावट !

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावाने सध्या सोशल मीडियामध्ये एक मेसेज व्हायरल होत आहे. पण हा मेसेज बनावट असल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या मेसेजचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे.

अॅपलचे माजी चेअरमन स्टीव्ह जॉब यांचे 2011 साली सादुपिंडाच्या कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. मरण्याच्या काही दिवस अगोदर त्यांनी एक संदेश आपल्या नावे सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यात त्यांनी आपल्या जीवनातील कारुण्य अनुभव व इतर काही माहिती दिली होती. ती वाचल्यानंतर सहाजिकच वाचकांना त्या व्यक्तीबद्दल दया उत्पन्न होते.

काही जणांनी या जुन्या संदेशाचा वापर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावावर केला आहे. जेथे स्टिव्ह जॉब यांनी आपले नाव दिले होते, त्या जागी मनोहर पर्रीकर यांचे नाव टाकण्यात आले आहे. तसेच, ज्या ठिकाणी आयटी क्षेत्रा असा उल्लेख आहे त्याठिकाणी पॉलिटीक्स असा उल्लेख केलेला आहे. तर शेवटी इंग्रजीतून मनोहर पर्रीकर असे नाव टाईप करण्यात आले आहे.

हा संपूर्ण मेसेज मराठीत असून त्यात काही अक्षरे इंग्रजीतून घालण्याचा प्रयत्न केला आहे. वाचल्यानंतर हा संदेश खोटा आहे याची प्रचिती सर्वांना आलेली आहे. गेले आठ दिवस प्रत्येक जण एकमेकांना हा मेसेज ग्रुपमधून आणि व्यक्तिगत पातळीवर देखील पाठवत आहेत. यामुळे प्रचंड गोंधळ उडालेला आहे. हा मेसेज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यापर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहोचला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)