मनोहर पर्रिकर जून अखेरपर्यंत गोव्यात परततील- सुनील ढवळीकर

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी ७ मार्चपासून अमेरिकेत असून जून अखेरपर्यंत ते गोव्यात परततील, असे आज राज्याचे परिवहन मंत्री सुनील ढवळीकर यांनी सांगितले. पर्रिकर यांच्या गैरहजेरीत राज्य सरकारचा कारभार हाकण्यासाठी त्रिसदस्यीय मंत्रिमंडळ सल्लागार समिती नेमण्यात आली असून या समितीत वरिष्ठ सदस्य असलेल्या ढवळीकर यांनी पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत आज माध्यमांना माहिती दिली.

मुख्यमंत्री पर्रिकर जून अखेरपर्यंत गोव्यात परततील, असे नमूद करताना पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला.दरम्यान, मुख्यमंत्री होण्याची माझी मानसिक तयारी झाली आहे, असे विधान करणाऱ्या ढवळीकर यांनी आज मात्र सूर बदलला. याबाबत बोलण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचे ते म्हणाले. लोकांना माझे काम आवडले असेल तर ते मला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवतील, असे मला म्हणायचे होते, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)