मनोरुग्णालयात अटेंडंटच्या 25 टक्‍के जागा रिक्‍त

येरवडा मेंटल हॉस्पिटल : प्रत्येकी पाच जणांमागे फक्‍त एक कर्मचारी

पुणे – येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी आवश्‍यक अटेंडंटची (परिचारक) संख्या अपुरी असल्याचे समोर आले आहे. यात आणखी 25 टक्‍के जागा रिक्‍त आहे. सध्या मनोरुग्णालयात 1, 700 जण उपचार घेत असून प्रत्येकी पाच जणांसाठी एकच कर्मचारी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनोरुग्णांना सांभाळण्यासाठी मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज असते. काहींना झटके येतात, तेव्हा त्यांना आवर घालण्यासाठी प्रशिक्षिम मनुष्यबळ गरजेचे असते. तसेच या रुग्णांना उपचारासाठी इतरत्र न्यावे लागते. त्यामधील काही जण जेलमधील कैदी असतात. काहीच दिवसांपूर्वी मनोरुग्णालयातील रुग्णांकडून अटेंडंटला मारहाण झाल्याचे समोर आले होते. यातील काहींच्या मोठ्या शस्त्रक्रिया असल्याने त्यांना ससूनसारख्या मोठ्या रुग्णालयात न्यावे लागते. तर, यापूर्वी ससूनमधील डॉक्‍टरांनी आरोप केल्याप्रमाणे मनोरुग्णांना जेव्हा ऑपरेशनसाठी आणले जाते, तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी मनोरुग्णालय प्रशासन अटेंडंट पुरवित नाही. यावर हे आरोप फेटाळून लावत अटेंडंट नियमित असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अटेंडंटची संख्या पाहता कमतरता असल्याचे समोर येते.

सध्या मनोरुग्णालयातील सतराशे पेशंट असून त्यांच्यासाठी 480 अटेंडंटची पदे मंजूर आहेत. त्यापैकी 118 पदे रिक्‍त आहेत. मनोरुग्णांच्या संख्येप्रमाणे प्रशासनाकडे वाढीव पदांसाठी मागणी वेळावेळी केली जाते.
डॉ. अभिजीत फडणीस, वैद्यकीय अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय
2, 540
प्रवेश क्षमता

1, 700
सध्याची रुग्णसंख्या

480
अटेंडंटची गरज

362
प्रत्यक्षातील अटेंडंट


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)