मनोज बाजपेयीच्या ‘भोंसले’ चे शूटींग पूर्ण

अभिनेता मनोज बाजपेयी याने ‘भोंसले’ चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले आहे. ट्‌विटरवर याची माहिती देताना मनोज म्हणतो, ‘भोंसले’च्या संपूर्ण टीमला धन्यवाद. चित्रपटाशी संबंधित देवाशीष मखीजा, पीयूष सिंह, संदीप कपूर, सौरभ गुप्ता, नमिता लाल यांच्या समर्पित मेहनतीमुळे चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे. एका सिने विषयक वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ‘अज्जी’ चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या देवाशीष मखीजाने याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात मरणासन्न अवस्थेत असलेल्या एका पोलिसाची भूमिका मनोज बाजपेयीने साकारली आहे.

काही काळापूर्वी “नाम शबाना’मध्ये मनोज वाजपेयीने रॉ एजंटची भूमिका साकारली होती. त्यामध्ये अक्षय कुमार आणि तापसी पन्नूच्या बरोबरीने त्यानेही भाव खाल्ला होता. मनोज बाजपेयी आगामी ‘अय्यारी’ या दिग्दर्शक नीरज पांडेच्या चित्रपटात दिसणार आहे. यात सिध्दार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रित सिंग प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमामध्ये नीरजला अक्षय कुमारला घ्यायचे होते. अक्षयनेही तयारी दर्शवली होती. मात्र वेळेचे गणित जुळत नसल्याचे कारण सांगून त्याने ऐनवेळी नकार दिला होता. यामुळे नीरज नाराज झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)