मनोज जोशी यांच्यासोबतच्या पडद्यामागील नात्याविषयी सांगतोय करणवीर शर्मा

करणवीर शर्मा सध्या वेगवेगळ्या वेब सीरिजमधील त्याच्या भूमिकांसाठी बराच गाजतोय. सोनी सबवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘मंगलम दंगलम-कभी प्यार कभी वार’ या मालिकेत तो बॉलिवूड आणि टेलिव्हिजनमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्यासोबत दिसणार आहे. त्यांच्यासोबत पडद्याबाहेर नेमकं कसं नातं आहे, याबद्दल करणवीर बोलत होता.

या मालिकेत करणवीर शर्मा एका तरुण, भावी जावयाची भूमिका करणार आहे. आपल्या भावी सासऱ्यांना (मनोज जोशी) खुश करण्यासाठी, त्यांच्या मुलीसाठी आपणच योग्य वर आहोत, हे पटवून देण्यासाठी तो शक्य ते सगळे प्रयत्न करणार आहे. भावी जावई आणि त्याचे सासरे यांच्यातील नातेसंबंधांचे विविध पैलू काहीशा विनोदी अंगाने या मालिकेत मांडण्यात आले आहेत.

मनोज जोशी यांच्यासोबत पडद्यामागे कसे संबंध आहेत हे विचारल्यावर करणवीर म्हणाला, “मी या मालिकेच्या शुटिंगला सुरुवात केली तेव्हा कुणालाच ओळखत नव्हतो. मनोज जोशी यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला ते फारच गंभीर वृत्तीचे वाटले होते. ते माझ्या सासऱ्यांची भूमिका करताहेत. त्यामुळे मी त्यांच्यासोबत फार खेळीमेळीने राहू नये, असं त्यांना वाटत असणार. मात्र, आता आम्ही थोडे मोकळे झालोय. ते मला माझ्या वडिलांप्रमाणेच वाटतात. चित्रिकरणात सतत मी त्यांच्याकडून सल्ले, मार्गदर्शन घेत असतो.” मनोज जोशी मनाने फारच तरुण आहेत, असंही तो म्हणाला.

करणवीरने साकारलेली अर्जून कुट्टी हा दाक्षिणात्य तरुण तत्वांना मानणारा, आधुनिक विचारसरणीचा मुलगा आहे. स्टीरीओटाइप गोष्टींवर त्याचा विश्वास नाही. मर्म विनोदबुद्धी आणि बुद्धिमत्तेने तो सर्वांचं मन जिंकून घेतो. तो एक उत्तम ‘बॉय नेक्स्ट डोअर’ आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)