मनेका गांधींची टीका अपुऱ्या माहितीच्या आधारे – सुधीर मुनगंटीवार  

मुंबई – यवतमाळमध्ये अवनी या वाघिणीच्या हत्येवरून केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन खात्याला फैलावर घेतले होते. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आज मनेका गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. मनेका गांधी यांनी केलेली टीका अपुऱ्या माहितीच्या आधारे असून वाघिणीला ठार करण्याचा निर्णय मंत्री किंवा सचिव घेत नाही. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शिकेनुसारच निर्णय घेतल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय मनेका गांधी यांचे प्राण्यांवर असणारे प्रेम मान्य आहे. त्या स्वतः महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत. वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलांचाही मला विचार करावा लागतो, असेही  मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पाच जणांचे बळी गेले, तेव्हाच वाघिणीला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र काही प्राणीप्रेमींनी उच्च न्यायालयातून यावर स्थगिती मिळवली. अखेर मृतांचा आकडा १३ वर गेला. वन विभाग वाघिणीचा शत्रू नाही. वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, तिने उलटून हल्ला केल्याने नाईलाजाने वाघिणीला ठार करावे लागले. शआफ़तअली खानवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, खान यांची बिहार सरकारने १५ दिवसांपूर्वीच नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर जर गुन्हेगारीचे आरोप असतील तर मनेका गांधी स्वत: केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी वॉरंट काढून त्याला कारागृहात टाकावे, हे वनविभागाचे काम नाही. शिवाय याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याऐवजी पाच न्यायमुर्तींची उच्च स्तरीय समिती नेमावी. केंद्रीय मंत्र्यांना तो अधिकार आहे, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी मनेका गांधींना दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)