मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचा दाभोलकर, पानसरे करू ; छगन भुजबळांना धमकी

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना एका निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचा दाभोलकर, पानसरे करू, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांत तक्रारही नोंदवण्यात आली आहे.

सदर पत्र ‘भुजबळ फार्म’ वर पाठवण्यात आलं आहे. मात्र हे पत्र निनावी असल्यामुळे पत्र पाठवणाऱ्या विषयी काही कळू शकले नाही. हे धमकीचं पत्र आल्यानंतर भुजबळ यांनी तात्काळ राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना त्याची माहिती दिली. धमकीचं पत्र मिळाल्याचं समजताच भुजबळ फार्मवर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. या धमकी पत्राची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. याप्रकरणी पोलिसांत याप्रकाराची तक्रारही करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)