मनुष्य जीवनात भक्‍ती हीच सर्वश्रेष्ठ- बापूसाहेब देहूकर

रेडा- मनुष्य जीवनात भक्‍ती हीच सर्वश्रेष्ठ आहे. जगद्‌गुरू तुकाराम महाराजांनीसुद्धा भक्तीची वाट हनुमंतरायाला विचारली. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात देवाची भक्‍ती करून आयुष्य चांगले जगावे, असे मत बापूसाहेब देहूकर यांनी व्यक्‍त केले. वडापुरी, भांडगाव, सुरवड या तीन शिवेवर असलेल्या दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या सभा मंडपाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. फुटतळे (ता. इंदापुर) येथील दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन पाडव्याच्यादिवशी बापूसाहेब महाराज देहुकर, हरिभाऊ महाराज बोरटे, समाजभूषण डॉक्‍टर लक्ष्मण आसबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भांडगाव, वड़ापुरी, शेटफळ हवेली, वकीलवस्ती, सुरवड या गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर बांधण्यात येणारा सभामंडप हा 40 बाय 80 चा आहे. या सभामंडपासाठी खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब घोलप यांनी या सभामंडपासाठी मदत केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, केशव बोराटे, राकेश फडतरे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले असल्याचे प्रास्ताविक करताना रमेश महाराज कोरटकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)