मनुष्यबळ अधिकारी सुवर्णमध्य साधणारा स्त्रोत – श्रीनिवास पाटील

दापोडी – मनुष्यबळ अधिकारी हा उद्योग व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील सुवर्णमध्य साधणारा स्तोत्र आहे, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी कासारवाडी येथे केले. यावेळी त्यांनी हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एच. ए.) कंपनीत पर्सनल अधिकारी म्हणून काम करत असताना आलेल्या रंजक अनुभव सांगितले.

व्हायब्रण्ट एच. आर. संघटनेच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. चित्रपट निर्माते व अभिनेते प्रवीण तरडे, किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक, पुण्याचे अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, उप कामगार आयुक्त विकास पनवेलकर, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे अप्पर संचालक वि. मा. यादव, व्हायब्रण्ट एच. आर. संघटनेच्या मुख्य सल्लागार ऍड. श्रीनिवास इनामती, ऍड. आदित्य जोशी आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनुष्यबळ विकास, पर्यावरण, सामाजिक, क्रीडा, शिक्षण या क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या व्यक्तींचा व्हायब्रण्ट एच. आर. गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. मोहन उचगावकर, माणिकराव पाटील, संग्रामराजे पवार, वृक्षवल्ली परिवार, निसर्ग राजा मित्र जिवांचे, श्री शिवसह्याद्री संस्था, सहंगामी फाउंडेशन, मुंबई डब्बावाले आणि विंग गर्ल दिक्षा दिंडे यांचा समावेश होता. तर एच. आर. ऑलिम्पियाडसाठी इंडस बिझनेस स्कूल आणि बेस्ट एच. आर. प्रॅक्‍टिसेससाठी कार्निवल ग्रुप यांना पहिल्या क्रमांक मिळविल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास 429 हून विविध उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले मनुष्यबळ व प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी मुंबई डब्बेवाले आणि व्यवस्थापन धडे याविषयावर डब्बावाला संघटनेचे सरचिटणीस किरण गवांदे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी मुंबई डब्बेवाले संघटनेचे कार्याध्यक्ष सोपान मरे, अध्यक्ष उल्हास मुके, सचिव अर्जुन सावंत, खजिनदार अशोक कुंभार, सदस्य बाळासाहेब भालेराव हे उपस्थित होते. दीपक खोत, शितल साळुंके, अजय रोपळेकर, अनिल उबाळे, सचिन पवार, अनिल जाधव, अस्लम शेख, संग्राम पाटील, ऋषिकेश दमामे, स्वप्नील पवार, निर्मला जाधव, प्रियांका पारखी, गजानन डफे यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)