मनुवाद्यांनी चोर दरवाजाने आरक्षण संपुष्टात आणले – लालूप्रसाद यादव  

नवी दिल्ली – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी केंद्र सरकारने संविधानात दुरूस्ती करून १० टक्के आरक्षण लागू केले आहे. यावर राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) लालू प्रसाद यादव यांनी ‘मनुवाद्यांनी चोर दरवाजाने आरक्षण संपुष्टात आणले’ असल्याची टीका ट्विटरवरून केली.

लालू प्रसाद यादव म्हणाले कि, उच्च शिक्षणात एससी, एसटी, ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्यानंतर १३ पॉइंटर रोस्टर लागू झाल्यानंतर नोकरीची पहिली जाहिरात आली आहे. यामध्ये एकही पद एससी, एसटी, ओबीसीसाठी राखीव नाही. मनुवाद्यांनी चोर दरवाजाने आरक्षण संपुष्टात आणले आहे. साडेतीन लाख रिक्त पदाची भरती यापद्धतीने केली जाणार आहे का? असा सवालही त्यांनी विचारला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, राजस्थानच्या केंद्रीय विद्यापीठाची २५ जानेवारी रोजी वेगवेगळ्या विभागांसाठी ३३ शिक्षकांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीचा दाखला देत लालूप्रसाद यादव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)