मनुका, अंजीरचे दर वधारले!

पिंपरी- दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे फराळीची खरेदी सुरू असतानाच फराळामध्ये उपयोगी असणाऱ्या सुक्‍या मेव्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. दरवर्षी काही नागरीक आपल्या आप्तेष्टीयांना, मित्रांना सुका मेवा भेट म्हणून देतात, यावेळी पॅकींग असलेल्या सुक्‍या मेव्याची मागणी वाढली आहे. यंदा मनुका व अंजीरच्या भावात शंभर रूपयाची वाढ झाली असून, इतर सुका मेव्याचे “दर जैसे थे’ असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी बाजारातील सुका मेवा दुकानांमध्ये नागरिकाची खरेदीसाठी गर्दी होत आहे. दिवसेंदिवस मिठाईमध्ये भेसळ होण्याचे प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. तसेच नागरिकामध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढल्याने नागरिकांनी सुकामेव्याचे बॉक्‍स भेट देण्यास प्राधान्य दिले असल्याचे दुकांनामध्ये पहायला मिळत आहे. तर काही दुकानांमध्ये खुला सुका मेवा विकण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात मागणी असल्याची माहिती विक्रेता मनोहर अठवाणी यांनी दिली. तसेच शहराच्या जवळपास असणाऱ्या खेड्यांच्या दुकानदारांकडून ही मोठ्या प्रमाणात सुक्‍या मेव्याची मागणी होत असून यंदा ग्राहकांची मागणी वाढत असल्याचे त्यांनी सागितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदा बाजारात सुक्‍या मेव्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून अंजीर व मणुकाची आवक घटल्यामुळे त्याचे दर 100 रूपयांनी वधारले आहेत. तरी ग्राहकांकडून त्याची मागणी होत आहे. बाजारात काजू, आक्रोड, बदाम, पिस्ता, गोडंबी, चारोळीआक्रोड, काळा मनुका यांची आवेकत वाढ झाली असून त्यांच्या प्रकारानुसार व गुणवत्तेनुसार त्यांचे दर ठरलेले आहेत. तसेच दिवाळीसाठी तयार करण्यात येणाऱ्या फराळामध्ये सुका मेव्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. त्यामुळे देखील नागरिकांची सुक्‍या मेव्याच्या खरेदीसाठी गर्दी होत असून त्याच्या मागणीत वाढ झाली असल्याची माहिती अठवाणी यांनी दिली.

अमेरिका, ऑस्टेलियातून बदामाची आवक…
सध्या बाजारात सुकामेव्याची आवक वाशी व पुण्यातून मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणांवर अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथून बदामाची आवक होत असते. तसेच इराणमधून पिस्ता व मध्यप्रदेश आणि ओरिसामधून चारोळीची आवक होत असल्याची माहिती विक्रेत्यांना दिली.

यंदाचे किलोमध्ये असलेले दर
काजू 840 ते 1320 रूपये किलो
अक्रोड- 1600 रूपये किलो
मुनुका- 400 रूपये किलो
काळा मनुका- 480 रूपये ते 560
अंजीर- 1000 रूपये ते 1400 रूपये किलो
बदाम 760 रूपये ते 960 रूपये किलो
चारोळई 1000 रूपये किलो.
गोडंबी 640 रूपये किलो
पिस्ता 1000 रूपये किलो

ग्राहकांची सुका मेव्याला मागणी दिवाळीच्या तोंडावर जास्त असते. मात्र, अजून काही नागरिकांचे पगार झाले नाहीत. त्यामुळे पाहिजे तशी गर्दी यंदा दिसून येत नाही. सुक्‍या मेव्यामध्ये अंजीर, मणुका वाढला आहेत तसेच खोबरे 40 रूपयांने महागले आहे.
– अल्ताफ अत्तार, विक्रेता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)