मनिष लाड खुनप्रकरणी दोघांना अटक

आरोपीत लष्करातील जवानाचा समावेश; दारूचे नशेत कृत्य केल्याची कबुली

सातारा – कास रोडवर असणाऱ्या गणेश खिंड येथील दरीत ढकलून देत मनिष शिवाजी लाड (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) याचा खून केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींत भारतीय लष्करातील जवान वैभव दिलीप इंगवले (रा.कृष्णानगर) आणि सागर सुनील दळवी (रा. सोमवार पेठ, सातारा) यांचा समावेश आहे. या दोघांना सातारा तालुका पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. अटकेतील दोघांना दि.3 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

-Ads-

यादोगोपाळ पेठेत राहणाऱ्या मनिष शिवाजी लाड याचा दि.16 रोजी खून झाला होता. त्या दिवशी मनिष रात्री घरी न परतल्याने त्याबाबतची तक्रार कुटुंबियांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. दरम्यान दि. 14 रोजी कास रोडवर असणाऱ्या गणेश खिंड येथील दरीत एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली होती.

यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी जावून मृतदेह ताब्यात घेतला. ताब्यातील मृतदेह बेपत्ता मनिष याचाच असल्याचे कुटुंबियांनी ओळखले. मनिष हा दि. 16 रोजी वैभव इंगवले आणि सागर दळवी यांच्यासोबत होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांना मिळाली होती. यानुसार त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार इंगवले आणि दळवी या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून गुन्हा नोंद असणारे दोघेही फरार होते. फरार असणारा इंगवले हा आसाम रायफल्स मध्ये कार्यरत असून त्याची नियुक्ती सध्या मणिपूर येथे आहे.

मणिपूर येथुन इंगवले हा सुट्टी घेवून सातारा येथे आला होता. फरार असणारा सागर दळवी हा खंडाळा येथील एका घरात असल्याची माहिती शनिवारी रात्री सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शाळीग्राम यांना मिळाली होती. यानुसार पो.नि.प्रदीपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी जाधव, एन.व्ही गिते, पो.हवा. दीपक पोळ, महेंद्र पाटोळे, हेमंत महाले, निलेश जाधव, उदय पावरा,यांच्यासमवेत सापळा लावत दळवी याला पकडले. त्याच्याकडून मिळाल्या माहितीनुसार रात्री मोळाचा ओढा येथून वैभव इंगवले यास अटक करण्यात आली. ताब्यातील दोघांकडे चौकशी केली असता, दारूच्या नशेत कृत्य केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.त्या दोघांना दि. 3 ऑक्‍टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)