मनिषा काळाणे यांना राष्ट्रसेवा पुरस्कार

यवत-डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 2018चा डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (नऱ्हे, जि. पुणे) येथील आदर्श व उपक्रमशील शिक्षिका मनिषा काळाणे यांना नुकताच पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे. मनिषा काळाणे यांनी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तालुक्‍यात शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्‌ल हा पुरस्कार दिला जातो. त्यांच्या या कार्याची दखल घेत डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, शिरुर – हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे, उपाध्यक्ष डॉ. अशोक पाटील, उद्योजक भाऊसाहेब शिंगाडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)