मनिका-मौमा जोडीला महिला दुहेरीत रौप्य

राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा

गोल्ड कोस्ट  – अव्वल महिला खेळाडू मनिका बात्रा आणि अनुभवी मौमा दास या जोडीने राष्ट्रकुल टेबल टेनिसमधील महिला  दुहेरीत रौप्यपदक पटकावून संस्मरणीय कामगिरी केली. मनिका-मौमा जोडीला अंतिम फेरीत फेंग तियानवेई आणि यु मेंगयु या सिंगापूरच्या गतविजेत्या जोडीकडून 5-11, 4-11, 5-11 असा पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत भारताचे हे पहिलेवहिले रौप्यपदक ठरले. गेल्या चारही स्पर्धांमध्ये या प्रकारांतील भारताची सर्वोत्तम कामगिरी कांस्यपदकाची होती.

मनिका बात्रा व मौमा दास या जोडीने त्याआधी इंग्लंडच्या जोडीवर 12-14, 11-3, 11-7, 11-6 अशी मात करताना उपान्त्य फेरी गाठली होती. कांस्यपदकाच्या लढतीत सुतीर्था मुखर्जी व पूजा सहस्रबुद्धे या भारतीय जोडीला यिंग हो आणि केरेन लिन या मलेशियाच्या जोडीकडून 13-15, 7-11, 11-8, 7-11 असा पराभव पत्करावा लागला. सुतीर्था-पूजा जोडीने त्याआधी कॅनडाच्या जोडीला 11-6, 11-7, 14-12 असे पराभूत करीत उपान्त्य फेरीत धडक मारली होती.
मनिका बात्राने याआधीच महिलांच्या एकेरीत उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. तसेच शरथ कमल व जी. साथियन या जोडीने येऊ एन पॅंग व शाव फेंग पोह या जोडीवर 7-11, 11-5, 11-1, 11-3 अशी मात करताना पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत स्‌.थान मिळविले. त्यांच्यासमोर सुवर्णपदकासाठी पॉल ड्रिंकहॉल व लियाम पिचफोर्ड या इंग्लंडच्या जोडीचे आव्हान आहे.

शरथ कमल व मौमा दास जोडीने झेन वांग व मो झांग या जोडीला 11-9, 11-9, 5-11, 11-5 असे पराभूत करीत मिश्र दुहेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. तसेच मनिका बात्रा व जी. साथियन या जोडीने शु जिए पॅंग व यिहान झोऊ या सिंगापूरच्या जोडीचा 11-6, 12-10, 14-12 असा पराभव करीत उपान्त्य फेरीत आगेकूच केली.

पुरुष एकेरीत शरथ कमलने इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डवर 9-11, 13-11, 10-12, 11-9, 11-7 अशी मात करताना पुरुष एकेरीची उपान्त्य पेरी गाटली. शरथने त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या हेमिंग हु याला 11-8, 12-10, 8-11, 11-6, 11-5 असे पराभूत केले होते. मात्र हरमीत देसाईला नायजेरियाच्या क्‍वाद्री अरुनाकडून 9-11, 8-11, 9-11, 8-11 असा पराभव पत्करावा लागला. तसेच साथियनला इंग्लंडच्या सॅम्युएल वॉकरने 11-8, 11-8, 13-11, 17-15 असे पराभूत केले.

मनिका बात्राने सिंगापूरच्या यिहान झोऊचे आव्हान 11-5, 11-6, 11-2, 6-11, 11-9 असे मोडून काढताना उपान्त्य पेरी गाठली. परंतु मौमा दासला सिंगापूरच्या यु मेंगयुकडून 13-15, 7-11, 5-11, 11-7, 5-11 असा पराभव पत्करावा लागला. तसेच उपान्त्यपूर्व फेरीतील अन्य सामन्यांत इंग्लंडच्या केली सिबलीने मधुरिका पाटकरला 11-9, 11-8, 2-11, 11-3, 8-11, 11-6 असे पराभूत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)