टेबल टेनिसमध्ये संस्मरणीय कामगिरी
गोल्ड कोस्ट- भारताची गुणवान युवा टेबल टेनिसपटू मनिका बात्राने महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावताना ऐतिहासिक यश संपादन केले. राष्ट्रकुल स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये भारताला मिळालेले महिला एकेरीचे हे पहिलेवहिले सुवर्ण ठरले.मनिकाने अंतिम लढतीत सिंगापूरच्या यु मेंगयु हिच्यावर 4-0 अशी एकतर्फी मात केली.
त्याआधी सकाळच्या सत्रात झालेल्या उपान्त्य फेरीच्या लढतीत मनिकाने विश्वक्रमवारीत चतुर्थ स्थानावर असलेल्या फेंग तियानवेईचा 4-3 असा रोमांचकारी पराभव करताना सांघिक स्पर्धेतील विजय हा योगायोग नसल्याचे सिद्ध केले. मनिकाने याआधी भारताला महिलांचे सांघिक सुवर्णपदक जिंकून दिले आहे. तसेच तिने मौमा दासच्या साथीत महिला दुहेरीत रौप्यपदकही पटकावले आहे. उद्या ती मिश्र दुहेरीच्या कांस्यपदकासाठी लढणार आहे. ही लढत जिंकल्यास मनिकाला या स्पर्धेतील चौथे पदक जिंकता येईल.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा