मनिका बत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

ब्रेकथृ स्टार’ पुरस्कार मिळवणारी मनिका पहिली भारतीय

नवी दिल्ली: भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस संघटनेचा मानाचा “ब्रेकथृ स्टार’ पुरस्कार मिळवला असून हा पुरस्कार मिळवणारी मनिका पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. इंचॉन येथे हा सोहळा पार पडला. यावेळी मनिकाने आपल्याला मदत करणाऱ्या सर्व संघटना, प्रशिक्षक, मित्र-परिवाराचे आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2018 हे साल मनिकासाठी चांगले गेले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मनिकाने भारताला महिला टेबल टेनिसमधिल पहिले सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले. तर, यानंतर वैय्यक्तिक प्रकारातही मनिकाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. याचसोबत महिला दुहेरी प्रकारात रौप्य तर मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदकाची कमाई करत मनिका बत्राने भारताचे स्थान भक्कम केले होते.

23 वर्षीय मनिका बत्राने यानंर इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये शरथ कमालच्या साथीने मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. यादरम्यान जागतिक क्रमवारीत मनिकाने 52 व्या स्थानी झेप घेतली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)