मनात विकारांना स्थान देवू नका – पं. ठाकूर

चिंचवड – माणसांच्या मनातील विकार दूर केल्याशिवाय परमेश्वराचे दर्शन होणार नाही. त्यामुळे मनात विकारांना स्थान देवू नका. परमेश्‍वराच्या प्राप्तीसाठी नामस्मरणाशिवाय कोणताही दुसरा उपाय नाही, असे प्रतिपादन मथुरा येथील पंडीत ठाकूर भारतभूषण यांनी केले.

शाहूनगर येथे श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त श्री साईमंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित श्रीमद्‌ भागवत कथा सोहळ्याच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, महेश चांदगुडे, सुप्रिया चांदगुडे, टी.एन. तिवारी, भगवान मुळे आदी उपस्थित होते.

पंडीत भारतभूषण महाराज म्हणाले, माणसाला स्वच्छ जागी रहायला बसायला आवडते. जर माणसांच्या मनात असंख्य विकारांचा वास व सहवास असेल तर त्या ठिकाणी परमेश्वराला जायला तरी कसे आवडेल आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी व परमेश्वराच्या सान्निध्यासाठी मनाची शुद्धी फार महत्त्वाची आहेत्‌ विकारांचा त्याग केल्याशिवाय हे कसे शक्‍य आहे. श्री भगवंताला समजून घेण्यासाठी प्रथम आपल्या मनाला चांगले समजून घेणे गरजेचे आहे. त्यातूनच चांगले विचार व वर्तन चिंतन घडणार आहे.

कथा आरंभ होण्यापूर्वी मंगल कलशाच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विविध पारंपारिक वाद्य व फुलांची सजावट असलेल्या रथातून कलश यात्रा परिसरातून काढली होती. त्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.श्रीमद्‌ भागवत कथा संगीतमय व नाट्यरुपी रविवार (दि. 25) पर्यंत रोज सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान चालणार आहे. त्यात भगवंताचे विविध अवतार व कार्य यांचे चिंतन मांडले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)