मनाचिये गुंती…

जगात आनंद विकत मिळत नाही नाही तर द्या हो पावशेर आनंद असंही मागायला कमी केलं नसतं माणसानं. आनंद शोधावा लागतो. पण हा माझा मित्र नाही. असलाच तर सावत्र मित्र.सावत्र म्हणायचं कारण हा फारसा येत नाही, दुस्वास करतो माझा मला मजेत बघितलं की हा गायबच होतो. क्वचितच येतो. दिलखुलासपणे बोलत नाही. तो फारच क्षणिक येतो. येतो म्हणेपर्यंत जातोही.

तरीही आनंद हा छोट्या गोष्टीतूनही शोधते मी. आजचीच गोष्ट. नुकतचं जन्माला आलेलं बाळ पाहात होते. एखादं ताजं टवटवीत फुल उमलावं तसं ते मला वाटलं पुढचे चार तास आनंदात गेले माझे. कधी एखादी गाण्याची ओळ कधी सुंदर कपडे, पाहिले तरी आनंद देतात. मोगऱ्याचा गंध आला तरी किती छान वाटतं. आनंद तर होतोच. कुणी पाठवलेले सुविचार, कविता, सुंदर फोटो आनंददायीच असतात. शोधलं तर सर्वच सापडतं तसा आनंदही सापडतो मग तो मुक्कामी असेपर्यंत मी इतरांना थारा देत नाही.

-Ads-

त्याच्या सहवासाची मजा लुटते आनंदी होते. तसा हा पाऊल न वाजवता निघून जातो. मी पुन्हा त्याला शोधीत राहते. हा लपाछपीचा खेळ मग चालूच राहातो दीर्घकाळ मी दमेपर्यंत. कधी आनंदाचे डोही आनंद तरंग असतात. त्यावेळी मी मी राहात नाही, उरतो मागे डोह नि त्यावरचे तरंग. मनाचे आरोग्य उत्तम राहावे असे वाटत असेल तर असे आनंदाचे क्षण आपणच आजूबाजूला शोधायचे असतात, हाच सुखी आणि आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र आहे.

वृंदा कार्येकर

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)