मनसे संदर्भात राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका जाहीर !

मुंबई: राजकारणातील दोन दिग्गज नेते पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या तर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं होत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी विमानाने एकत्र प्रवास केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि भेट महत्वाची मानली जात आहे. मात्र या दोन दिग्गजांमध्ये नेमकी काय दाळ शिजली, हे अजून तरी गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे संदर्भात आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता महाआघाडीत मनसेला स्थान नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनसेला सोबत घेण्यासाठी काहीदिवसांपूर्वी राष्ट्रवादीने काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र काँग्रेसच्या केंद्रीय स्तरावर त्याला विरोध झाला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरून परत येत असताना त्यांनी शरद पवारांसोबत प्रवास केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)