मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जामीन मंजूर

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी दिवाणी फौजदारी न्यायालयाने दिलासा दिला आहे. 2008 मधील परप्रांतीयांविरोधातील आंदोलनप्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर झाला आहे. रेल्वे भरती परीक्षेदरम्यान 21 ऑक्‍टोबर 2008 रोजी मनसेने आंदोलन केले होते.

यादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील साईप्लाझा या हॉटेलवर दगडफेक केली होती. या प्रकरणी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे आणि आणखी सहा मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणाचा खटला इगतपुरी न्यायालयात सुरु आहे. राज ठाकरे न्यायालयात हजर होत नसल्याने त्यांना वारंवार समन्सही बजावण्यात आला होता. अखेर नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आज स्वत: सुनावणीसाठी इगतपुरी न्यायालयात हजर झाले. अखेर न्यायदंडाधिकारी के. आय. खान यांनी राज ठाकरे यांना जामीन मंजूर केला. माजी महापौर अशोक मूर्तडक हे जामीनदार होते.

राज ठाकरे यांच्या वतीने ऍड सयाजी नागरे आणि ऍड अजय शिर्के यांनी बाजू मांडली. यावेळी न्यायालय परिसरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)