मनसेला महाआघाडीत घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव तथापी कॉंग्रेसचा मात्र विरोध – निरूपम 

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या विरोधात संघटीतपणे लढण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठेवला आहे तथापी त्याला कॉंग्रेसचा विरोध आहे असे मुंबई प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की अलिकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची मुंबईत महाआघाडीच्या निमीत्ताने चर्चा झाली त्यावेळी या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधिकृतपणे कॉंग्रेस पुढे ठेवला.
महाआघाडीतील वातावरण बिघडू नये म्हणून अजून मनसेबाबतचा निर्णय कॉंग्रेसने कळवलेला नाही पण राज्य आणि केंद्रीय पातळीवर मनसेला कॉंग्रेसचा विरोध आहे असे ते म्हणाले. मनसे हा हिंसाचारावर विश्‍वास असलेला पक्ष आहे आणि या पक्षाने आधी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. तसेच मनसेकडे स्वताची काही मते आहेत का असा सवालही निरूपम यांनी केला आहे. त्यांच्याकडे काही मते असतील तर ती त्यांनाच लाभो असे नमूद करीत मननेला बरोबर घेण्यास त्यांनी सक्त विरोध दर्शवला आहे. मुंबईत मनसे आणि निरूपम यांच्यातील संघर्ष जुना आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने आंदोलन सुरू केल्यानंतर निरूपम यांनी फेरीवाल्यांची बाजू घेत मनसेला कडवा विरोध केला होता तेव्हा पासून त्यांच्यात हा संघर्ष सुरू आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)