मनसेचे 6 ऑगस्टपासून रिऍलिटी “कान’चेक आंदोलन

मुंबई – मल्टिप्लेक्‍समध्ये सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे आता मनसे तपासणार आहे. आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर मनसे 6 ऑगस्टपासून रिऍलिटी “कान’चेक आंदोलन करणार आहे.

प्रेक्षकांना 1 ऑगस्टपासून मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश सरकारने दिले आहेत. मनसेचे कार्यकर्ते 6 तारखेपासून सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे तपासणार आहेत. अंमलबजावणी होत नसल्यास मनसेचे कार्यकर्ते मल्टिप्लेक्‍सच्या स्टाफला कानाखाली लगावून रिऍलिटी “कान’चेक आंदोलन करणार आहेत.

-Ads-

उच्च न्यायालयाने वारंवार प्रश्न उपस्थित करुनही मल्टिप्लेक्‍स थिएटरमधील खाद्य पदार्थांच्या मनमानी किमती कमी होत नव्हत्या. याशिवाय मल्टिप्लेक्‍समध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेने खळ्ळखट्याक आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी थिएटर कर्मचाऱ्यांना मारहाणही केली होती. त्यानंतर हा मुद्दा राज्यभर गाजला होता.

दरम्यान, मल्टिप्लेक्‍सचालकांची मुजोरी अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. त्यासंदर्भात मनसेने पुन्हा परिपत्रक काढून मल्टिप्लेक्‍सचालक आणि सरकारला इशारा दिला आहे. सरकारचा आदेशही न जुमानणाऱ्या मल्टिप्लेक्‍सचालकांना कुणाचे अभय आहे, असा प्रश्न मनसेने विचारला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)