मनसेचे सातव करणार उपोषण

वाघोली – अष्टापूर, भवरापूर, हिंगणगाव आदि पूर्व हवेली भागातील गावांतील वाळू उपशा सारख्या अवैध धंद्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड असताना अधिकारी कारवाई करीत नसल्याने शिरूर हवेलीचे मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप सातव यांनी या प्रकरणी उडी घेतली असून या भागाचे तलाठी योगीराज कणीचे यांची तातडीने बदली करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली आहे. याभागात पाच वर्षे काम करणाऱ्या कणीचे यांची बदली झाली नाही तर दि. 10 एप्रिल पासून उपोषण करू, असा इशारा सातव यांनी हवेलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, माझ्याकडील अतिरीक्त गावांचा कार्यभार काढून घ्यावा. यासाठी वरिष्ठांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मी बदली साठी स्वतःहून अर्ज करणार असल्याचे तलाठी योगीराज कणीचे यांनी म्हंटल्याने मनसे स्टाईल उपोषण होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)