मनसेचे अकलूजमध्ये विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

अकलूज- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान अकलूजमधील रस्त्यावर असलेले अनधिकृत गाळे आणि त्या रस्त्यावर केलेले बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात यावी, अकलूजमधील बेकायदेशीर नळ कनेक्‍शनधारकांची कनेक्‍शने टप्प्या-टप्प्याने हप्ते भरून घेऊन नियमित करावीत, अकलूजमधील 21खोल्या जि. प. शाळा क्र. 2 च्या मागे राहत असलेल्या जनतेच्या नावावर जागा नियमित करण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी अकलूज ग्रामपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब वाईकर यांनी निवेदन स्वीकारले.
या आंदोलनाला मनसे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे, भाजपचे पंचायत समिती सदस्य अजय सकट, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब सपताळे, जनसेवा संघटनेचे सुधीर रस्ते, लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे, दलित महासंघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा नगमा शिवपालक, बापू वाघमारे, धनाजी पाटील, महिला सेना तालुका अध्यक्ष रुक्‍मिणी रणदिवे, प्रहार अपंग संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष विजय कुलकर्णी, जनसेवा संघटनेचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे, बहुजन ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आकाश होनमाणे, शहराध्यक्ष सुदाम आवारे, बहुजन ब्रिगेडचे तालुका संपर्क प्रमुख उदय कांबळे, आकाश लोखंडे, बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष कन्हैया ठोंबरे, अजिनाथ साठे, बंडू कांबळे, वैभव लोखंडे, सोमनाथ लोखंडे,विकी केसकर, अमोल कुचेकर, विनोद सावंत, इनुस शेख, नितीन ढावरे, बाबाजी खंडागळे, विक्रांत कांबळे, राजू खंडागळे, महावीर साळवे, विष्णू साठे, शिवराज साठे, संजय साठे, धवल कांबळे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)