“मनरेगा’तील मोबदला वेळेत मिळणार 

संग्रहित छायाचित्र

मुंबई – महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाअंतर्गत लार्भार्थींना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात सुधारणा झाली आहे. विलंबाने मिळणाजया मोबदल्याची टक्केवारी केवळ 18 वर आली आहे. 72 टक्के मोबदला वेळेत दिला आहे. विलंबामध्ये बिहार आघाडीवर आहे. “मनरेगा’ अंतर्गत लार्भार्थींना 90 दिवसांच्या आत कामाचा मोबदला न दिल्यास तो “विलंब’ श्रेणीत जातो. 2016-17 या आर्थिक वर्षात देशभरातील 73 टक्के मोबदला “विलंब’ श्रेणीत होता.

त्यांची थकबाकी 2.38 लाख कोटी होती. हा आकडा 2017-18 या आर्थिक वर्षात 67,956 कोटींवर आला. एकूण मोबदल्यात त्याची टक्केवारी फक्त 18 टक्के राहिली. लार्भार्थींना विलंबाने मोबदला देण्यात बिहार आघाडीवर आहे. महाराष्टलातील ही टक्केवारी 27 इतकी असल्याचे स्टेट बॅंकेच्या आर्थिक संशोधन अहवालात समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)